BJP Celebration News SaamTv
Video

BJP News : राज्यात महायुतीची जोरदार मुसंडी, भाजप कार्यालयात जल्लोष सुरु!

Assembly Election Results : विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी महायुतीच्या गोटात सध्या 217 जागा जातांना दिसत आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर या विजयाच्या वाटचालीचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महायुतीच्या गोटात सध्या 217 जागा जातांना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी आता समोर यायला लागली आहे. त्यानंतर राज्यातलं चित्र स्पष्ट व्हायला लागलं आहे. मतमोजणी सुरू झाल्या पासूनच भाजप आणि महायुतीला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळतांना दिसत आहे. सध्या महायुतीची 217 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे ही विजयाच्या दिशेने वाटचाल महायुती करत असल्याने आता ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. भाजप कार्यालयाच्या बाहेर या आघाडीचा जल्लोष साजरा केला जात आहे. कार्यकर्ते भाजप कार्यालयाबाहेर फटाके फोडून गुलाल उधळून आनंद व्यक्त करत आहे. यावेळी पेढ्यांचं देखील वाटप करण्यात येत आहे. एकूणच या निकालांच्या आकडेवारीवरून राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल का, याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मात्र या आकडेवारीबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

आणखी एक पक्ष फुटणार? भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह ३० कोटींची ऑफर; आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT