Pravin Tayde News saamtv
Video

Pravin Tayade News : वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासाचं सोनं झालं; बच्चू कडुंचा पराभव करणाऱ्या तायडेंनी व्यक्त केल्या भावना

Achalpur Assembly Constituency : अचलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केला आहे. भाजपच्या पदरात हा मोठा विजय तायडे यांनी खेचून आणला आहे.

Saam Tv

अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू विरुद्ध भाजपचे प्रवीण तायडे यांच्यासह काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली. यात भाजपचे प्रवीण तायडे यांनी विजय संपादन करून मोठं यश भाजपच्या परड्यात खेचून आणलं आहे. या मोठ्या विजयानंतर प्रवीण तायडे यांनी साम टीव्हीशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या माणसासाठी आमदार होणं ही फार मोठी गोष्ट आहे. माझ्यावर वरिष्ठांनी दाखवलेल्या विश्वासचं सोनं आज मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने झालं आहे, असं तायडे यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना प्रवीण तायडे म्हणाले की, मी ग्रामपंचायतपासून राजकारणात आलो. त्यानंतर विविध आंदोलनाच्या माध्यमातून मी जनतेसाठी झटत राहिलो. पुढे भाजपमध्ये आल्यावर अचलपूर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे. एवढंच डोक्यात ठेऊन मी या ठिकाणी व्यवस्थित चालना देऊन पक्ष बांधणी केली. त्यामुळेच आज वरिष्ठांनी आणि मतदारांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे. या भागातली काही गावं अचलपूर मतदारसंघात येत नाही. त्यात माझं स्वत:चं देखील गाव या विधानसभा मतदारसंघात नाही. त्यामुळे माझं, माझ्या घरच्यांचं कोणाचंही मत मला मिळालेलं नाही. असं असूनही गावातल्या प्रत्येकाने माझ्यावर विश्वास दाखवून माझ्यासाठी प्रचार केला आहे, असं सांगत प्रवीण तायडे यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

Dhurandhar 2 : 'धुरंधर २'च्या यशात मिठाचा खडा; आदित्य धरवर चोरीचा आरोप, कायदेशीर कारवाईची धमकी

Viral video mumbai: मुंबईतील मुलुंड स्टेशनवर घडला धक्कादायक प्रकार, रूळांवर उतरून दोन तरुणांची हाणामारी

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

खाकीने ओलांडली मर्यादा! पोलीस ठाण्यातच ASI कडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हादरवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT