Pravin Darekar SaamTv
Video

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

सध्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्याची आकडेवाडी समोर आली असून यात महायुती आघाडीवर आहे. याचसंदर्भात प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Manasvi Choudhary

महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती आहे. सरकार आमचंच येईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा पहिला टप्पा समोर आला आहे. सुरूवातीच्या पहिल्या टप्प्यात महायुतीला सर्वाधिक मतं मिळाली आहे. महायुतीने २१७ चा आकडा नुकताच पार केला आहे. तर केवळ भाजप १२४ जागांवर आघाडीवर असताना दिसत आहे, अशातच भाजपच्या नेत्याकडून जल्लोष होताना दिसत आहे. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले, "भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. यंदा मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल यात कोणतीही शंका नाही. भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे. अशातच भाजपचा मुख्यमंत्री होणार असण्यास आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे."

"आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कारण महाराष्ट्राच्या जनतेनी पुन्हा आम्हाला पसंती दिली आहे. यंदा आम्ही २०० पार करू असं चित्र स्पष्ट होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असताना दिसत आहे. विधानसभेच्या निकालानुसार, महायुतीला प्रचंड यश मिळताना दिसतय. महायुतीचा विजय होण्याची चिन्ह दिसत असताना विरोधकांनी रडीचा डाव सुरू केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

Maharashtra News Live Update : पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

Pitru Paksha 2026: घरात अकाली मृत्यू झाला असेल, तर पितृपक्षात नक्की करा हे ३ उपाय; दिवंगत आत्म्याला मिळेल मोक्ष!

SCROLL FOR NEXT