Anil Bonde And Yashomati Thakur SaamTv
Video

MP Anil Bonde : बोंडेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

Saam Tv

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडे यांच्यावर टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर बुलडाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देखील राहुल गांधींवर टीका केली असून, 'राहुल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे', असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दरम्यान या वक्तव्यानंतर आता काँग्रेसच्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी बोंडे यांचा चांगला समाचार घेतला आहे. 'डॉक्टर बोंडे यांचं संतुलन बिघडलंय, त्यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती झालं पाहिजे. एखादा अडाणी माणूस बोलला तर आपण समजू शकतो मात्र हे डॉक्टर आहे बोंडे हे बेअक्कल मूर्ख माणूस आहे.'' असं त्यांनी म्हंटलं आहे. तसेच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या दालनात यशोमती ठाकूर यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. जोपर्यंत डॉक्टर बोंडेवर तक्रार दाखल होत नाही व अटक करत नाही, तोपर्यंत पोलीस आयुक्त यांच्या दालनातून उठणार नाही, अशी मागणी यावेळी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात; 'या' महिलांना मिळणार ४५०० रुपये

Nagpur News: शाळेत खेळताना पडला, दवाखान्यात न नेता शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारलं; नागपुरमधील धक्कादायक घटना

Jammu-Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; जैश-ए-मोहम्मदच्या ६ साथीदारांना अटक

Mumbai Local Train : मुंबईकरांचा पुन्हा होणार खोळंबा, रविवारी रेल्वेच्या या मार्गावर ब्लॉक; अनेक लोकल रद्द

Weather Update : परतीच्या पावसाची चाल थबकली, महाराष्ट्रात पुन्हा पडणार जोरदार पाऊस; आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT