Hemant Rasane SaamTv
Video

Hemant Rasane News : प्रत्येक मतदारासाठी मी काम करणार; आमदारकी मिळाल्यावर हेमंत रासनेंची पहिली प्रतिक्रिया | VIDEO

Pune Kasba Assembly Constituency : पुण्यातील बहुचर्चित कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचा पराभव करत भाजपच्या हेमंत रासने यांनी विजय मिळवला आहे. आमदारकीची लढाई जिंकल्यानंतर आज पहिल्या दिवशी सकाळीच ते कट्ट्यावर आपल्या मित्रांसोबत चहा पिताना दिसले.

Saam Tv

मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आज आमदार झालो असलो तरी पहिल्यासारखच असेल. मला जनतेने निवडून दिलं आहे. त्यामुळे मी त्यांचंच काम करेन. कसबा मतदारसंघ ऐतिहासिक वारसा असलेला आहे. कसब्यात अजून बरीच कामं करायची आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार हेमंत रासने यांनी साम टीव्हीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. पुण्यातील बहुचर्चित कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी सकाळी आपला दिनक्रम आपल्या मित्रांसोबत कट्ट्यावर सुरू केला. मित्रांच्या भेटीगाठी घेत त्यांनी चहाचा आस्वाद घेतला. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कसब्याचा विकास कसा करायचा यासाठी पुढच्या पाच वर्षाचा पूर्ण प्लॅन तयार आहे. आता फक्त त्यावर अंमलबजावणी करायची आहे. मी अधिकारापेक्षा जबाबदारी मानणारा कार्यकर्ता आहे. मला 90 हजार मतं मिळाली आहे. कसब्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणाला एवढी मतं पडली आहेत. त्यामुळे कसब्याच्या जनतेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी निश्चित पार पडेल. कसब्यातल्या प्रत्येक मतदारासाठी मी काम करणार आहे, असं देखील रासने यांनी सांगितलं.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT