BJP News SaamTv
Video

BJP Video: भाजपची यादी पितृपक्षानंतर ?

Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप 2 दिवसांची मॅरेथॉन बैठक घेणार आहे. मुंबईत 23 आणि 24 सप्टेंबरला ही बैठक पार पडेल.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मॅरेथॉन बैठक येत्या 23 आणि 24 सप्टेंबरला होणार आहे. 2 दिवसांची ही बैठक मुंबईत ठेवण्यात आली आहे. भाजप कोअरकमिटी आणि निवडणूक समितीचे सदस्य या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत भाजपच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता आहे. पितृपक्षानंतर भाजप आपल्या पहिल्या 50 उमेदवारांची नावं घोषित करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशात आणि राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे आता वाहायला लागले आहेत. त्याच अनुषंगाने भाजप आता 2 दिवसांची महत्वाची मॅरेथॉन बैठक घेणार आहे. मुंबईत 23 आणि 24 सप्टेंबरला ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेतले जाणार असण्याची शक्यता आहे. या बैठकीत भाजपच्या उमेदवारांवर अंतिम शिक्कामोर्तब होईल असं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पितृपक्षानंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावं घोषित करणार आहे, असंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT