Nagpur BJP News SaamTv
Video

Devendra Fadnavis News : पुन्हा देवेंद्र! नागपूरात भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष | Marathi News

Nagpur News : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच नागपूर येथील भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

Saam Tv

राज्याचा मुख्यमंत्री कोण याचा पेच अखेर सुटला असून भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आज पार पडलेल्या भाजप आमदारांच्या कोअर कमिटीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी अखेर सत्तास्थापनेचा दावा भाजपने केला आहे. यावेळी भाजपच्या गटनेतेपदी देखील देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन उपस्थित होत्या. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. नागपुरात भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा होताच फटाके फोडून गुलाल उधळत एकच जल्लोष केला.

दरम्यान, उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून सायंकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधीत शपथ घेतील.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT