Lakshaman Dhoble SaamTv
Video

Laxman Dhoble Meets Supriya Sule : माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची घरवापसी ?

Maharashtra Politics : लक्ष्मण ढोबळे यांनी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने ढोबळे पुन्हा तुतारी हाती घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे लक्ष्मण ढोबळे घरवापसी करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खलबतं सुरू असतानाच आता भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ढोबळे तुतारी हाती घेणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपमध्ये डावललं जात असल्याचं लक्ष्मण ढोबळे यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर ढोबळे यांचा मुलगा हा शरद पवार गटाकडून निवडणकून लढवण्यास इच्छुक असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. माजी मंत्री लक्षं ढोबळे हे आधी शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या गटात इनकमिंग सुरू आहे त्या अनुषंगाने ढोबळे यांनी सुप्रिया सुळे यांची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. मोहोळ मतदारसंघ हा शरद पवार गटकडून लढवला जाणार असल्याने या भेटीचा काही फायदा होईल का या दृष्टीने देखील ही भेट पहिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

SCROLL FOR NEXT