BJP Latest News SaamTv
Video

Vidhan Sabha Election Results : सुरुवातीच्या कलात भाजपने गाठलं शतक!

BJP Is On Lead In Assembly Election Results : मतमोजणीतील सकाळच्या सुरुवातीच्या कलात महायुती आणि विशेषत: भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर सध्या भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे.

Saam Tv

भाजपने मतांतील आघाडीच्या अकडेवारीत शतक गाठलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेत स्थळावर सध्या भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे. मतमोजणीतील सकाळच्या सुरुवातीच्या कलात महायुती आणि विशेषत: भाजप आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली आहे. आज निकालाचा दिवस असून सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात सकाळच्या सुरुवातीच्या कलात भाजपने आघाडीत शतक पार केलं आहे. त्यामुळे सध्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यातील अनेक भागात भाजपच्या उमेदवारांना आघाडी मिळतांना दिसत आहे. त्यामुळे मविआ आणि महायुतीत चुरशीची लढत रंगली आहे. पहिल्या काही वेळातच भाजपच्या बाजूने मतमोजणीचा कल यायला लागल्यानंतर आता भाजप आणि महायुतीने बहुमताचा आकडा पार केलेला दिसत आहे. शिंदे सेना सध्या 53 जागांवर आघाडी करत आहे. तर अजित पवार यांच्या गटाची 33 जागांवर आघाडी आहे. अद्याप पूर्ण मतमोजणी होणं बाकी आहे. त्यानंतरच अंतिम निकाल समोर येणार आहेत. मात्र सुरुवातीचा कल हा भाजपच्या बाजूने असल्याचं बघायला मिळत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT