Shivsena - BJP SaamTv
Video

Maharashtra Politics : भाजप - शिंदे गटात वादाचा 'बुरखा'

Shivsena - Bjp : भायखळा येथील शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप केलं आहे. त्यावरून भाजप आमदारांनी या कार्यक्रमाला विरोध असल्याच म्हंटल आहे.

Saam Tv

उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदे गटाने देखील विधानसभेसाठी मुस्लिम उमेदवारांकडे लक्ष वळवलं आहे. भायखळा येथील शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप केलं आहे. लोकसभेत ठाकरे गटाचे अरविन्द सावंत यांनी यामिनी जाधव यांचा पराभव केला होता. त्यामुळे आता अल्पसंख्यांक मतांवर शिंदे गटाने देखील लक्ष वळवल्याच चित्र आहे.

याबद्दल बोलताना मात्र यामिनी जाधव यांनी या कार्यक्रमाचा निवडणुकीशी संबंध नसल्याचं म्हंटल आहे. तर भाजपचे आमदार आशिष शेलार यांना या कार्यक्रमाबद्दल विचारले असता, 'आम्हाला असे कार्यक्रम मान्य नाही. मला या कार्यक्रमाची पूर्ण कल्पना नाही तरीही अशा बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाच भाजप कधीच समर्थन करत नाही', असं म्हणत शेलारांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या बुरखा वाटपंच्या कार्यक्रमावरून शिंदे गट आणि भाजपात बुरख्याचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT