Dhule BJP candidate Win saam tv
Video

Municipal Election: भाजपचा विजयरथ सुस्साट ! धुळ्यात चौथा उमेदवार बिनविरोध

Dhule Election : धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयीरथ दौडत आहे. आतापर्यंत चौथा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

Nandkumar Joshi

भूषण अहिरे, धुळे

महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी न दिल्यानं सर्वाधिक नाराजी उफाळलेल्या भाजपनं बंडोबांना शांत केल्याचं चित्र आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून येत असतानाच, अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी धुळ्यातही भाजपनं बिनविरोध निवडीचा चौकार ठोकला आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या गोटात मोठ्या हालचालींना वेग आला आहे, आज पुन्हा एकदा अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चौथा उमेदवार देखील बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक 17 अ मधील भाजपचे उमेदवार अमोल मासुळे हे बिनविरोध निवडून आले आहेत.

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने अमोल मासुळे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराने आपला उमेदवार अर्ज माघारी घेत थेट भाजपत प्रवेश केला. भाजपच्या आतापर्यंत एकूण चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आणखी किती नगरसेवक बिनविरोध निवडून येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT