Pakistani Flag Protest  Saam Tv
Video

Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ झेंड्यावर पाय ठेवून आणि थुंकून अनोखे आंदोलन|VIDEO

Terror Attack Protest: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचे रक्त खवळले आहे, या हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Omkar Sonawane

नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती रस्त्यावर ठेवण्यात आली होती. नागरिकांनी त्या झेंड्यावर पाय ठेवून आणि थुंकून आपला संताप व्यक्त केला व दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.

या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी "दहशतवाद्यांना आता दहा वेळा विचार करावा लागेल" अशा शब्दांत कठोर कारवाईची मागणी केली.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास व्यक्त करत, अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा विश्वासही व्यक्त केला. या आंदोलनामुळे नागरिकांमध्ये रोषाचं वातावरण पहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT