Devendra Fadanvis SaamTv
Video

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच अमृता फडणवीस यांच्याकडून औक्षण, संविधान चौकात जोरदार शक्तीप्रदर्शन

Nagpur News : देवेंद्र फडणवीस हे आज नागपुरात आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं आहे. तत्पूर्वी अमृता फडणवीस यांच्याकडून त्यांच औक्षण देखील करण्यात आलं आहे.

Saam Tv

भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. फडणवीस हे नागपूरमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी आज ते अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच औक्षण त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजताच रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांकडून अर्ज भरण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस हे नागपुरात आपला अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी त्यांच्याकडून संविधान चौकात शक्तीप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. या शक्तीप्रदर्शनाला भाजपचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: नितीन गडकरी देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलीने देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यात हा सामना रंगणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते मुकेश जिवतोडे पोलिसांच्या ताब्यात

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT