Mahayuti News SaamTv
Video

Mahayuti News : महायुतीत मुख्यमंत्री ठरला? देवेंद्र फडणवीसांच मोठं विधान, पाहा Video

Devendra Fadanvis Statement : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आलं तर महायुतीतून मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल उत्सुकता कायम असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर आता चर्चाना उधाण आलं आहे. 'मनसेच्या साथीनेच भाजपचा मुख्यमंत्री होईल', असं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीयवर्तुळात सगळ्यांच्या भुवया सध्या उंचावल्या आहेत. मात्र यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिलेली दिसली आहे. 'राज ठाकरे यांच्या शुभेच्छांचा मी आदराने स्वीकार करतो. मात्र सरकार महायुतीचं येईल, भाजपचं नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीसुद्धा महायुतीचाच असेल फक्त भाजपचा नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे', असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या सूचक वक्तव्याने मात्र महायुतीत नेमकं काय खलबत सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT