BJP and NCP Meeting SaamTv
Video

Maharashtra Politics : शहांचा दौरा संपताच सुरू झाल्या भाजप - NCP च्या स्वतंत्र बैठका

Latest Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा पार पडला असून त्यानंतर आता महायुतीमधील पक्षांच्या स्वतंत्र बैठका सुरू झाल्या आहेत. या बैठकांमध्ये काय चर्चा होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Saam Tv

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि NCP ची स्वतंत्र बैठक पार पडणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर सागर बंगल्यावर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांची आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक काल घेतली होती. त्यानंतर आज भाजप आणि NCP ने आपल्या पक्षांच्या आज स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत. भाजपच्या बैठकीत सुधीर मूनगंटीवार हजर आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांच्या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. अमित शहा यांनी केलेल्या सूचना या प्रत्येक पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या सूचना या बैठकीत देण्यात येण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शहा यांनी महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना दिली आहे. ज्या जागा निवडून येतील त्याचा लवकरात लवकर आढावा घेऊन एकत्रित बैठक करण्याच्या सूचना देखील शहा यांनी या दौऱ्यात दिल्या आहेत. जागा वाटपांबाबत दिल्लीत अंतीम चर्चा होण्याची दाट शक्यता असल्याने भाजप आणि NCP च्या या स्वतंत्र बैठकांमध्ये काय चर्चा होते ही बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT