Nashik Accident  Saam Tv
Video

Nashik Accident: रात्रीच्या अंधारात थेट खड्ड्यात कोसळला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, थरार CCTVत कैद

Bike rider death after falling into repair pit In Nashik : नाशिकमध्ये एका व्यक्तीचा पाईपलाईन दुरुस्तीच्या खड्ड्यात पडल्यामुळे मृत्यू झालाय. ही घटना भगूर परिसरामध्ये घडली आहे.

Rohini Gudaghe

नाशिक : नाशिकमध्ये पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेला खड्डा मृत्युचा खड्डा बनल्याचं समोर आलंय. कारण भगूर परिसरात पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून ४४ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अमित गाढवे, असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या अंधारामध्ये दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडल्याचं समोर आलंय, ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.

अमित दुचाकीवरून जात असताना पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडला. या घटनेत अमितचा मृत्यू झालाय. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामानंतर देखील खड्डा न बुजवल्याने अमित गाढवेला जीव गमवावा लागला, असं बोललं जात आहे. भगूर नगरपरिषद या घटनेला जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. काम झाल्यावर खड्डा न बजावणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करा, अशी मागणी नागरिकांमधून होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT