Bihar Election Saam tv
Video

Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

Bihar Elections 2025 Phase 1 voting updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज १२१ जागांसाठी मतदान होत आहे. तेजस्वी यादव, सम्राट चौधरी आणि तेज प्रताप यादव यांच्यात तगडी लढत आहे. जन सुराजचे प्रशांत किशोरही चर्चेत आहेत.

Namdeo Kumbhar

Bihar Election 2025 Phase 1 voting LIVE: NDA vs Mahagathbandhan face-off, voter turnout & polling trends : बहुचर्चित बिहार निवडणुकाचं मतदान आज पहिला टप्पा आहे. 121 जागांसाठी मतदान होतंय. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.एनडीए युती आणि महागठबंधन असे 2 कट्टर विरोधी पक्ष आमने सामने उभे आहेत. तिसरं आश्वासक नाव जन सुराज च्या प्रशांत किशोर यांचं चर्चेत आहे.

बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात १२१ जागांवर आज मतदान होत आहे. यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, तसेच लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांच्यासह गायिका मैथिली ठाकूर यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. तेजस्वी यादव यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव यांनी 'जनशक्ती जनता दल' या स्वतंत्र पक्षाची स्थापना करून निवडणूक लढवत आहेत. तर, गायिका मैथिली ठाकूर या अलीनगर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत. उर्वरित १२२ जागांसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामा

SCROLL FOR NEXT