Chhagan Bhujbal Saam TV
Video

NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय कोण घेणार? छगन भुजबळांनी थेट नावच सांगितले

Chhagan Bhujabal On NCP Merger: अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यावर आता छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विलिनीकरणाच्या मुद्द्यानं आता नवं वळण घेतलं. 'आमच्या पक्षाचा कॅप्टन ठरलाय आता तेच निर्णय घेतील', असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवारच घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे विलिनीकरणाचा विषय सध्या आमच्यासाठी बंद असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले की, 'ऐवढे मोठे निर्णय हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल. ते होईल त्यासाठी घाई करण्याचे कारण नाही. पण आज तेच ठरलं होतं, झालं पाहिजे हे बोलण्यात अर्थ राहिला नाही. नवीन कॅप्टन आलेले आहेत, त्यांना बसूद्या, काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या नंतर ते बघतील काय करायचे ते.'

तर, शशिकांत शिंदे यांनी सांगितले की,'माझ्या माहितीप्रमाणे, पक्षाच्या दोन्ही एकत्रिकरणासंदर्भातील निर्णय झाला होता. त्यांची अनेक लोकं देखील बोलत आहेत. आता मला वाटते की आम्ही हा विषय बंद केला आहे. आम्ही मागे लागलो आहोत विलिनीकरणासाठी असे चित्र निर्माण केले जात आहे. आमच्याकडून अजिबात गडबड नव्हती. दादांचे असे झाल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली. त्यांनी चर्चा दिल्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो. शपथपूर्व बोललो. आता या विषयावर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही. विलिनीकरणाबाबत आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया येणार नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराण-अमेरिका युद्ध सहा महिने चालणार? युद्धासाठी इराणचा मास्टरप्लॅन काय?

नाशिकमध्ये 300 कोटींचा भूखंड घोटाळा, 49 बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल

२४ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक घेतली निवृत्ती; राजकीय नेत्यांवर केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, क्रीडा वर्तुळात खळबळ

उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? राजकीय वर्तुळात खळबळ

Malegaon: मालेगावमध्ये तुफान राडा, महिला अन् तरुणांकडून दुकानाची तोडफोड; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT