Donald Trump Tariff India Narendra Modi x
Video

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरिफ केला कमी, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Donald Trump Tariff India Narendra Modi : मोदी आणि ट्रम्प यांच्यातील फोन चर्चेनंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे आयात-निर्यात अधिक सुलभ होणार आहे.

Namdeo Kumbhar

US India Tarrif Reduced : अमेरिकेने भारतावरील टॅरिफ घटवला आहे. 25 टक्क्यांवरील टॅरिफ 18 टक्क्यांवर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजतेय. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. त्यानंतर अमेरिकेने भारतावरील टॅरिफमध्ये मोठी कपात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली. US India trade deal news

भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी भारत आता व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल. भारत आणि अमेरिका यांच्यात एका महत्त्वाच्या व्यापार करारावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे दोन्ही देशांतील आयात-निर्यात अधिक सोपी होईल. अमेरिका भारतावर लावणारा टॅरिफ (एक प्रकारचा आयात कर) २५% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आलाय.

भारत देखील अमेरिकन वस्तूंवरील व्यापारी निर्बंध शून्यावर (ZERO) आणणार आहे. यामुळे अमेरिकन वस्तू भारतात स्वस्त होऊ शकतात. पंतप्रधान मोदींनी 'Buy American' धोरणाला पाठिंबा दिला आहे. भारत अमेरिकेकडून ऊर्जा (Energy), तंत्रज्ञान (Technology), शेती उत्पादने आणि कोळसा यांसारख्या क्षेत्रांत तब्बल ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची खरेदी करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT