राज्यातील ७० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, ५०० कोटी रुपये मंजूर (संग्रहित छायाचित्र) saam tv
Video

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

maharashtra farmer loan waiver 500 crore benefit 70000 farmers : राज्यातील जवळपास ७० हजार शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना ५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत.

Nandkumar Joshi

उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात २०१७ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली होती. या कर्जमाफी योजनेपासून जवळपास ६ लाखांहून अधिक लाभार्थी शेतकरी वंचित आहेत. आता सरकारनं २०२५ मध्ये झालेल्या अधिवेशनात या योजनेंतर्गत ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यांचे वितरण आता करण्यात येणार आहे.

याबाबत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार हे शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना राबवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास ८ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील सुमारे ७० हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे येणे बाकी होते. त्या आठही जिल्हा सहकारी बँकांना पैसे देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा ७० हजार शेतकऱ्यांना होणार आहे. यात विदर्भातील बँका आहेत. नागपूर, वर्धा आणि बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचा समावेश आहे, असे भोयर म्हणाले.

राज्यातील 8 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील जवळपास ७० हजार खातेदारांना याची मदत मिळणार आहे. त्यांना लवकरात लवकर कर्जमाफीची रक्कम वितरित केली जाणार आहे. अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमितपणे कर्ज भरणारे शेतकरी यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी देणार आहे, अशी माहितीही भोयर यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT