Gold- Silver Price Today Saam tv
Video

Gold-Silver Price: सोनं-चांदी खरेदीची सुवर्णसंधी, सोन्यात १०००० तर चांदीत ३०००० रुपयांची घसरण

Gold- Silver Price Today In Jalgaon Suvarnanagari: जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं १० हजारांनी तर चांदी ३० हजारांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

Priya More

जळगावच्या सराफ बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात १० हजार रुपयांची घसरण झाली तर चांदीच्या दरामध्ये ३० हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोनं-चांदीचे दर कमी झाल्यामुळे खरेदी करण्याची चांगली संधी आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ७२ हजार १० रुपयांवर तर चांदीचे दर ३ लाख ७२ हजार ८६० रुपयांवर आले आहेत. सोन्या चांदीच्या दरात काल विक्रमी वाढ झाल्यानंतर आज मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सुवर्णनगरीत सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे ग्राहकांनी सोनं-चांदी खरेदीकडे पाठ फिरवली होती. पण आता दर कमी झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

बनावट इंस्टाग्राम अकाऊंटचा पर्दाफाश; मैत्रिणींचेच अश्लील फोटो केले व्हायरल, महिला वकिलाचा धक्कादायक कारनामा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी...

Hair Care : तुम्हाला ही सुंदर केस हवेत? मग केसांना लावा कडुलिंबाचे तेल, जाणून घ्या फायदे

ठाण्यात महायुतीचं ठरलं! शिंदे गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT