Gold and silver prices Drop Saam Tv
Video

Gold-Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली

Gold and silver prices Drop: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीचे दर कमी होत असल्यामुळे खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली पोहचले आहे.

Priya More

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीचे दर वाढले होते. त्यामुळे सोनं- चांदी विकत घेणं सध्या सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलं होतं. मात्र तो योग आता आला आहे. इराण-इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडत असल्यामुळे सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जवळपास २ महिन्यांनंतर सोनं दीड लाखांच्या खाली आले आहे. सध्या सोन्याचा भाव १ लाख ४८ हजार ६२९ रुपये तोळा इतका झाला आहे. तर चांदीचा दर २ लाख ३७ हजार ९३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. दरवाढीचे उच्चांक गाठल्यानंतर मार्च महिन्यात गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल, प्रतितोळा १२०० रूपयांनी भाव बदलला, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Red Velvet Cake Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, स्पाँजी आणि क्रीमी रेड वेलवेट केक, वाचा रेसिपी

Congress : काँग्रेसचा धक्कादायक निर्णय! भाजपमध्ये गेलेल्या ७९ नेत्यांवर निलंबनाची कारवाई; राजकारणात खळबळ

शिपाईपासून अधिकाऱ्यांपर्यंत पगारात मोठी वाढ होणार, 8व्या वेतन आयोगातील 2.57 फिटमेंट फॅक्टरचे संभाव्य गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT