Suraj Chavhan Meets Ajit Pawar SaamTv
Video

VIDEO : सूरज चव्हाणने घेतली अजितदादांची भेट; पाहा नेमकी काय झाली चर्चा

BB Marathi Winner Suraj Chavan Meet Ajit Pawar : मराठी बिग बॉस सीजन 5 चा विजेता सुरज चव्हाण याने नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झाली.

Saam Tv

बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सूरज चव्हाण आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेला. यावेळी त्याने अजितदादांना आपली बिग बॉसची ट्रॉफी देखील दाखवली. अजितदादांनी देखील अतिशय कुतुहलाने या ट्रॉफीला न्याहाळले. या भेटीवेळी पार्थ पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉसची ओळख आहे. या कार्यक्रमाचा पाचवा सीजन नुकताच संपला आहे. बारामतीच्या अत्यंत छोट्या गावातला सूरज चव्हाण हा यंदाच्या सीजनचा मानकरी ठरला आहे. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांचे पुण्यातील जिजाऊ निवासस्थानी सूरज चव्हाण आणि अजित पवार यांची भेट झाली. अजितदादांनी यावेळी सूरजसोबत गप्पा मारल्या. त्याचे कुटुंब, भविष्यातील प्लॅन्स याबद्दलही अजितदादांनी चौकशी केली आहे. यावेळी सुरजने सोबत आणलेली ट्रॉफी अजितदादांनी कौतुकाने हातात घेऊन पहिली. यावेळी सूरजने त्याचा गाजलेला झापुक झुपूक डायलॉगही अजितदादांना म्हणून दाखवल्यावर हा डायलॉग ऐकल्यावर अजित पवारही हसायला लागले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT