Lonavla Bhushi Dam Saam TV
Video

Bhushi Dam Latest Update : लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो, पर्यटकांची प्रचंड गर्दी |VIDEO

Lonavala Rain : मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्यामुळे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण हे अखेर मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहे. मावळ परिसरात रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि डॅम भरून वाहू लागला.या निसर्गसौंदर्याने नटलेल्या दृश्याची झलक पाहण्यासाठी पर्यटकांनी भुशी डॅमवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. डोंगराळ परिसर, वाहतं पाणी आणि हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणामुळे पावसाळी पर्यटनासाठी भुशी डॅम हे एक आकर्षण बनलं आहे.पावसात न्हालेलं हे दृश्य पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असून फोटो आणि व्हिडीओ घेत त्यांच्या आनंदात भर पडत आहे.

मागील ३ दिवस तुफान पाऊस कोसळतोय. गेल्या २४ तासात १४३ मिलमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा आतापर्यंत ७९१ मिलमीटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत केवळ ३०३ मिलमीटर पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४८८ मिलमीटर अधिकचा पाऊस बरसल्यामुळे यंदा भुशी धरण लवकर ओसंडून वाहू लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT