Bhiwandi Fire  saam tv
Video

Bhiwandi Fire : आगडोंब उसळला! भिवंडीत भीषण आग, १०-१२ गोदामे खाक, VIDEO

bhiwandi warehouse fire : भिवंडीत फर्निचर गोदामाला भीषण आग लागली. त्यात आजूबाजूची १० ते १२ गोदामे जळून खाक झाली आहेत. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरले होते.

Nandkumar Joshi

भिवंडीत आज मोठा आगडोंब उसळला. येथील राहनाळ गावाजवळील एका फर्निचर गोदामाला भीषण आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की आजूबाजूची १० ते १२ गोदामे जळून खाक झाली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

फर्निचर गोदामाला लागलेली आग वेगाने पसरली. परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले होते. संपूर्ण परिसर धुराने काळवंडला होता. काही वेळातच आगीनं आजूबाजूची १० ते १२ गोदामे कवेत घेतली. त्यात ती जळून खाक झाली, अशी माहिती देण्यात आली. खबरदारी म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या गोदामांमध्ये ठेवलेल्या फर्निचरचा कोळसा झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाची चार ते पाच वाहने तिथे पोहोचली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT