Bhandara Heavy Rain Saam TV
Video

Bhandara : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, गावांचा संपर्क तुटला | VIDEO

Heavy Rainfall : भंडाऱ्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर येण्याची स्थिती निर्माण झाली असून, तुमसर तालुक्यातील तामसवाडी ते सीतेपार गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाचे पाणी वाहू लागले आहे. या परिस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे.

नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून, संबंधित यंत्रणांना अलर्ट ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, अजून काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य सरकारने माहितीच्या अधिकारात बदल

ठाकरेसेनेचा व्हीप फुटीर खासदारांनी झुगारला, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

Friday Horoscope: अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणं टाळा; वाचा आजचं राशीभविष्य

Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं ३६ व्या वर्षी निधन; पोटाच्या कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT