Bhandara Rain Saam TV
Video

Bhandara Rain : भंडारा जिल्ह्याला रेड अर्लट , शाळा कॉलेजला सुट्टी | VIDEO

Heavy Rainfall : भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून आज रेड अर्लट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज हवामान विभागानं जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी शाळा, अंगणवाड्या तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाच्या जोरदार सरींमुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. हवामान विभागानुसार पुढील २४ ते ४८ तास भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत संवेदनशील असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडावं, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मातंग समाजाच्या आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ आझाद मैदानावर येणार

Mangalsutra Designs: महिलांसाठी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत ‘हे’ ५ शॉर्ट मंगळसूत्र पॅटर्न्स; मॉडिश आणि क्लासी लूकसाठी बेस्ट

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT