BEST Bus Strike भुषण शिंदे
Video

Best Strike : मुंबईकरांचे हाल होणार, BEST चे हजारो कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, या आहेत प्रमुख मागण्या

Best Strike in Mumbai : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. सरकारने मेस्मा लागू करून संपावर बंदी घातली असली तरी बस सेवा आणि प्रवाशांवर परिणाम होण्याची शक्यता कायम आहे.

Namdeo Kumbhar

मुंबईतील बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे मुंबईतील बस सेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने तातडीने अत्यावश्यक सेवा कायदा (MESMA) लागू करत या संपावर बंदी घातली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्य अर्थसंकल्पात विलीन करण्यात यावा.

कंत्राटीकरण आणि पीपीपी (PPP) तत्त्वावर बेस्टच्या मालमत्तांचा पुनर्विकास करण्यास कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

वेटलिस्टवरील कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत कायम करून घेण्यात यावे.

बेस्ट मधील १०,००० रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी त्वरित अदा करण्यात यावीत.

सरकारने संपावर बंदी घातली असली, तरी कर्मचारी आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT