beed scam  saam tv
Video

Beed scam: संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांनी ३९ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप, ओबीसी नेते बाळासाहेब सानप म्हणाले...VIDEO

Beed News: ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

Omkar Sonawane

बीड जिल्ह्यात 2014 साली जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदलीमध्ये तत्कालीन मंत्री सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जिल्हा परिषद शिक्षण सभापती तथा शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी चक्क 39 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप

यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

ते म्हणाले, 14 वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेत बिंदु नामावली प्रश्न उद्भवला आहे. ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या. त्या काळात 2014 साली सर्व शिक्षकांनी मागणी केली होती की, बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे. त्यावेळेस राज्याचे मंत्री सुरेश धस होते. त्यावेळी संदीप क्षीरसागर हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. त्यांच्याच काळात ही भरती झाली आहे.त्याकाळात प्रत्येक जणांकडून तीन लाख रुपये घेण्यात आले असून तेराशे जणांची बदली केली आहे.एकूण 39 कोटी रुपयांचा घोटाळा 2014 साली झाला असा गंभीर आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बाळासाहेब सानप यांनी केला .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा ठप्प

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT