बीडच्या परळीत धनंजय मुंडेंच्या गटातील नगरसेवक आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालीय. विशेष म्हणजे परळी हा आमदार धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे. एमआयएमचे नगरसेवक प्रतिनिधी आणि सत्ताधारी धनंजय मुंडे गटातील नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. विकासकामांच्या पाहणीदरम्यान दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी शाब्दिक चकमक होऊन वातावरण तापल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
एकमेकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केलीय. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये परळीच्या नगराध्यक्षांचे पतीसुद्धा व्हिडिओमध्ये दिसत आहेत. धक्काबुक्कीची घटना परळी शहरातील बरकत नगर परिसरात ही घटना घडलीय. हा राडा एमआयएमचे नगरसेवक प्रतिनिधी आणि सत्ताधारी धनंजय मुंडे गटातील नगरसेवक व नगराध्यक्षांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांच्यात झाला. सुरुवातीला दोन्ही गटामध्ये शाब्दिक वाद झाला त्यानंतर ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.