Valmik Karad’s ex-associate Bala Bangar reveals horrifying truth behind businessman Mahadev Munde’s public murder in Parli. saam tv
Video

Walmik Karad: महादेव मुंडेंना कराडच्या लोकांनी मारलं अन् मानेचा तुकडा आणला, वाल्मिकच्या सहकाऱ्याचा थरारक खुलासा|VIDEO

Beed News: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात थरारक खुलासा करण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याने सांगितले की, मुंडेंची हत्या करून त्यांचा मानेचा तुकडा वाल्मिककडे आणण्यात आला होता.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या वाल्मीक कराड आणि त्याच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनी केल्याचा दावा विजयसिंह बाळा बांगर ने केला आहे. विजयसिंह बाळा बांगर हे आरोपी वाल्मीक कराडचे जुने सहकारी आहेत. व्यापारी महादेव मुंडे यांची ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी मी त्या ठिकाणी वाल्मीक कराडला भेटण्यासाठी गेलो होतो, आणि त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्यांना मारला आहे. त्यांनी व्यापारी महादेव मुंडे यांचा एक मासाचा तुकडा आणला होता.

व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकात हत्या करून त्यांच्या अंगावरील एक तुकडा दाखवण्यासाठी वाल्मीक कराडकडे आणला होता, आणि त्या ठिकाणी मी प्रत्यक्षात उपस्थित होतो. मी हे सर्व पाहून आश्चर्यचकित झालो. अहंकार दुखवल्याने व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती.

हत्या करणारे लोक वाल्मीक कराडच्या जवळचे होते. वाल्मीक कराडच्या रक्ताच्या नात्यातीलच लोकांनी महादेव मुंडे यांची हत्या केली. आणि महादेव मुंडे यांच्या मानेचा एक तुकडा वाल्मीक कराडने आणायचा सांगितलं तो तुकडा घेऊन ती पोर त्या ठिकाणी आली होती. त्या ठिकाणी मी होतो. महादेव मुंडे हत्या प्रकरणांमध्ये मी स्वतः जबाब नोंदवणार आहे. पोलीस अधीक्षकच नव्हे तर देशाच्या गृहमंत्र्यांना आणि सर्वांना भेटून या संदर्भात मी सर्व हकिकत सांगणार असून माझं जर कोणी ऐकून नाही घेतलं तर मी कुठपर्यंतही जायला तयार आहे वाल्मीक कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी हा संपूर्ण विषय सांगितला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

Rain Flood : निसर्गाचं रौद्ररूप! मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत, ४४ नागरिकांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये 4000 वारकऱ्यांची सायकलवारी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

SCROLL FOR NEXT