Walmik Karad SaamTv
Video

Walmik Karad : वाल्मिक कराडला आज पुन्हा केज कोर्टात हजर करणार, काय आहे कारण? पाहा Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका लावल्यानंतर त्याला आज पुन्हा एकदा थोड्याच वेळात केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात खंडणी प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला आज पुन्हा केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यासाठी पोलिसांचं पथक त्याला घेऊन केज कोर्टाकडे रवाना झालं आहे. काल देखील कराड याला केज कोर्टापुढे हजर केलं होत. त्यानंतर त्याच्यावर अखेर मकोका लावण्यात आला होता. आज सुद्धा त्याला केजच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मोठ्या बंदोबस्तात त्याला न्यायालयात घेऊन जाण्यात येत आहे. त्यामुळे मकोका लागल्यानंतर आज काय निर्णय होतो, पुढील तपास कसा होईल? हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात यावा यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले होते. त्यांनी आंदोलन देखील केलं होतं. इतर सातही आरोपींवर मकोका लावण्यात आलेला होता. मात्र केवळ खंडणी प्रकरण असल्याने कराडवर मकोका लावलेला नव्हता. मात्र मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा देत आंदोलन केल्यानंतर काल वाल्मिक कराडची कोठडी संपल्यावर त्याला पुन्हा केज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर मकोका लावत पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा ताबा एसआयटीला मिळालेला आहे.

दुसरीकडे वाल्मिक कराड याच्या समर्थकांनी देखील आज परळी बंदची हाक दिलेली आहे. काल कराडवर मकोका लावल्यानंतर कराडचे समर्थक् आक्रमक झाले होते. परळी बंदची हाक देत समर्थकांनी आंदोलन सुरू केलं होतं. यावेळी टायर जाळून बसची देखील तोडफोड करण्यात आलेली होती. त्यानंतर आज देखील परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या सर्व घटनेनंतर सध्या परळीत तणावपूर्ण वातावरण बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT