Walmik Karad SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडचे ३ मोबाईल जप्त; काय मिळाली माहिती? पाहा Video

Walmik Karad News : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात खंडणी प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचे तब्बल ३ मोबाईल सीआयडीकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यांची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार आहे.

Saam Tv

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे ३ मोबाईल सीआयडीने जप्त केले आहेत. या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोग येथील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला आता वेग आला आहे. वाल्मिक कराड याने सरेंडर केल्यानंतर उर्वरित आरोपींना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. आरोपी वाल्मिक कराडचे ३ मोबाईल सीआयडीने जप्त केले असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी आज सीआयडीकडून कराडच्या आवाजाचे नमुने घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्यापही विष्णु चाटे याचा मोबाईल तपास पथकाला सापडलेला नाही आहे. त्याच्या मोबाईलचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. त्याचा मोबाईल सापडेपर्यंत वाल्मिक कराड हा फोनवरून खंडणीसाठी बोलल्याचं स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत या दोघांचे मोबाईल हातात येत नाही तोवर या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे लागणार नसल्याचं समजत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT