Walmik Karad SaamTv
Video

Walmik Karad : कराडच्या अडचणीत वाढ; बीड न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी | Video

Santosh Deshmukh Case : सरपंच हत्या प्रकरणात खंडणीचा आरोप आलेल्या वाल्मिक कराड याला आज बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Saam Tv

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आज व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे कराड याला बीड न्यायालयासमोर हजार करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे. चौकशीसाठी तो सध्या कोठडीत आहे. यापूर्वी देखील त्याला खंडणी प्रकरणात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. मात्र मकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यात दिलेली ७ दिवसांची एसआयटी, सीआयडी कोठडी आज संपल्यानंतर बीड न्यायालयासमोर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे हजार केलं होतं. यात तपास अधिकाऱ्यांनी स्वत: न्यायालयीन कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली. त्यानंतर ही मागणी मान्य करत कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराड याला सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Shocking : धक्कादायक! सासऱ्याच्या धक्क्याने खाली पडून सुनेचा मृत्यू; ८ महिन्यांची चिमुकली आईविना पोरकी

Fatty Liver: लिव्हरवर फॅट्स जमा होऊन सूज आलीये? रोज प्या ही ३ ड्रिंक्स, काही दिवसातच वितळून जाईल चरबी

Local Body Election : राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार, २० जिल्हा परिषदा, पंचयत समित्या, ग्रामपंचायतमध्ये धुरळा

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार! ३१ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता; IMD चा मोठा अलर्ट

SCROLL FOR NEXT