Dhananjay Munde SaamTv
Video

Dhananjay Munde : अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील; संदीप क्षीरसागर नेमकं काय म्हणाले, पाहा Video

Sandeep Kshirsagar Statement : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे.

Saam Tv

अजित पवार मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्येत खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू आहे. याबद्दल स्वत: धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांसह विरोधकांकडून केली जात आहे. आज याबद्दल निर्णय होणार असल्याने त्यावरच आता शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली असून अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील असं त्यांनी म्हटलं आहे. जोवर या प्रकरणात आरोपी फासावर चढत नाही, त्यांना शिक्षा होत नाही मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. आम्हाला खात्री आहे की अजित पवार नक्कीच याबद्दल योग्य निर्णय घेतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT