Manoj Jarange Patil SaamTv
Video

Manoj Jarange : .. अन्यथा संपूर्ण गाव आंदोलन करेल; मनोज जरांगेंनी पुन्हा साधला फडणवीसांवर निशाणा | VIDEO

Santosh Deshmukh Death Case Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मस्साजोग येथे आज ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. त्यानंतर मनोज जरांगे यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

Saam Tv

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबीयांच्या मागण्या खऱ्या मनाने मान्य केल्या पाहिजेत. गुंडांच्या टोळीला संरक्षणाची भींत घालून देशमुख दुजाभाव करू शकत नाहीत. उद्या सकाळी १० वाजेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण गाव आंदोलन करेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. सोमवारी या प्रकरणी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थांनी आणि संतोष देशमुख यांच्या भावाने आंदोलन केल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर जरांगे यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळी धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या मागण्या उद्या सकाळी १० वाजेपर्यंत मान्य केल्या नाही तर संपूर्ण गाव आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, संतोष देशमुख यांचा खून झाला. आता धनंजय देशमुख यांची या कुटुंबाला गरज आहे. आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी आहोत. तुम्ही आंदोलन करत आहात हे ऐकताच मी धावत पळत येथे आलो. तुम्ही एकटे समजू नका. आपल्याला हा लढा न्यायापर्यंत न्यायचा आहे. तुम्ही आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलू नका. हा साधासोपा विषय नाही. आम्हाला संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंगावर काटा आणणारी घटना, शेतकऱ्याने २ मुलांना अंगणात संपवलं, त्यानंतर कुटुंबासह पेटवून घेतलं, ६ जणांचा मृत्यू

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

SCROLL FOR NEXT