Massajog News SaamTv
Video

Santosh Deshmukh Death Case : मस्साजोग पुन्हा तापलं; उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन

Massajog News : मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे.

Saam Tv

बीडची मस्साजोग येथील ग्रामस्थांनी माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन करत उर्वरित 3 आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बीडमध्ये आता वातावरण तापलेलं बघायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील इतर तीन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून यावेळी करण्यात येत आहे. याबद्दल कालच ग्रामस्थांकडून इशारा देण्यात आला होता. या तिन्ही आरोपींना आज सकाळपर्यंत अटक झाली नाही, तर बुधवारी सकाळी 10 वाजता ग्रामस्थ जलसमाधी आंदोलन करतील असा इशारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता हे जलसमाधी आंदोलन सुरू झालं आहे.

बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. काल या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याने पुण्यात पोलिसांना सरेंडर केलं आहे. त्यानंतर त्याची चौकशी देखील सुरू झाली आहे. मात्र अद्यापही उर्वरित तीन आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. याच संतापाचा उद्रेक आज मस्साजोगमध्ये झालेला बघायला मिळत आहे. अजून या आरोपींना अटक का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित करत बुधवारी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनात गावातील सगळे लोकं सहभागी झालेले आहेत. जोपर्यंत या तिन्ही आरोपींना अटक करण्यात येणार नाही तोवर आम्ही तलावातून बाहेर येणार नाही असा पवित्रा सगळ्यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात लहान मोठ्यांपासून महिला वृद्ध सगळेच सहभागी झाले असून तलावात जलसमाधी उतरलेले बघायला मिळत आहेत. यावर आता पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT