Beed Rain SAAM TV
Video

Beed Rain : बीडमध्ये मुसळधार पाऊस, पोलिस स्टेशनमध्ये साचले गुडघाभर पाणी |VIDEO

Heavy Rain : बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आहे. या धुवाधार पावसाचा परिणाम बीडमधील ग्रामीण पोलीस स्टेशनवर झालेला दिसून येत आहे. स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पावसाने शहरासह प्रशासकीय कार्यालयालावरही मोठा परिणाम केला आहे. बीड शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनला या पावसामुळे अक्षरश: तलावाचे स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे. स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पोलीस स्टेशन मधील संगणक त्याचबरोबर संपूर्ण पोलीस स्टेशनचे साहित्य कागदपत्र पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे पोलिस स्टेशनचा कामकाज पुर्णपणे ठप्प झाला आहे. पोलिस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या या पुरासारख्या परिस्थितिमुळे पोलिस प्रशासनास मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडून साचलेले पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.मुसळधार पावसाने फक्त जनजीवनच विस्कळीत केले नाही तर आता प्रशासनालाही त्याचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT