Santosh Deshmukh Case SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या भावाची सीआयडीकडून चौकशी? मोठी अपडेट आली समोर | Video

Dhananjay Deshmukh In Police Station : माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. सरपंच देशमुख यांच्या भावाला सीआयडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे.

Saam Tv

बीडमधील माजी सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. आता सरपंच देशमुख यांच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सीआयडीकडून संतोष देशमुख यांच्या भावाची आता चौकशी होत आहे.

बीड जिल्ह्यातील केजच्या मस्साजोग येथील माजी सरपंच असलेले संतोष देशमुख यांची 20 दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसंच या प्रकरणातील चौघा आरोपींना अटक करून शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरत आहे. त्यासाठी राज्यभरातून निषेध मोर्चे देखील काढण्यात येत आहेत. तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तसंच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू समजले जाणारे वाल्मिक कराड यांचं देखील नाव पुढे आलेलं असल्याने सत्ताधारी पक्ष या प्रकरणात तपास करत नसल्याचं देखील विरोधकांचं म्हणण आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी स्पेशल एसआयटी नेमल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला दिसत आहे. याच अनुषंगाने आज सीआयडीचे पथक आणि पथकाचे प्रमुख सचिन पाटील बीडमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना देखील बीडच्या शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याबद्दल बोलताना, मी स्वत:च पोलीसांना भेटायला आलो असल्याचं देशमुख यांच्या भावाने सांगितलं असलं तरी सीआयडीच्या पथकाकडून त्यांची काय चौकशी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र या प्रकरणाला आलेल्या वेगामुळे पोलीसांच्या हाती काही धागेदोरे लागले असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT