Shivraj Divate Case Saam Tv
Video

Beed Crime: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट, समाधान मुंडेला भरचौकात बेदम मारहाण| VIDEO

Shivraj Divate Case: बीडच्या शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडेला भरचौकात मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

बीडच्या शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या मारहाण प्रकरणात आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान मुंडे याला जमावाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. आधी शिवराज दिवटेच्या मित्रांनी समाधान मुंडेला मारहाण केली. याचाच बदला घेण्यसाठी समाधान मुंडेने शिवराज दिवटेला मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. समाधान मुंडेला शिवराज दिवटेच्या मित्रांनी केसाला धरून भर चौकात तुडवल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

शिवराज दिवटे या तरुणाचे अपहण करून त्याला डोंगरपट्ट्यात नेऊन १० ते १५ जणांच्या टोळीने अमानुष मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे तर उर्वरीत आरोपींचा शोध घेत आहेत. याचदरम्यान या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान मुंडेला मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असून त्यामध्ये समाधान मुंडेला शिवराज दिवटेचे मित्र मारहाण करताना दिसत आहेत. आधी शिवराजच्या मित्रांनी मारहाण केली त्याचाच बदला म्हणून समाधान मुंडेच्या टोळीने शिवराजला मारहाण केल्याचे बोलले जात आहे. पोलिस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT