Satish Bhosale Saam Tv
Video

Satish Bhosale : खोक्या भोसलेला ७ दिवसांची पोलीस कोठडी, तरुणाला मारहाण करणं भोवलं

Beed Crime : प्रयागराजला अटक झाल्यानंतर सतीश भोसलेला बीडला आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला शिरूर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

Yash Shirke

बीड पोलिसांनी आज सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली होती.

दिलीप आणि महेश ढाकणे या पितापुत्रांना सतीश भोसलेने मारहाण केली होती. त्याने बॅटने महेश ढाकणेला अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. व्हायरल व्हिडीओमुळे हे प्रकरण तापले. पुढे पोलिसांनी सतीश भोसलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. याच दरम्यान सतीश भोसले फरार झाला. त्याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली. शिरूर पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी देखील झाली आहे. काल त्याला प्रयागराजहून छत्रपती संभाजीनगरला आणण्यात आले. पुढे त्याची रवानगी बीडला करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सतीश भोसलेला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

डायबिटीजच्या रुग्णांनी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या, रक्तातील साखर वाढणार नाही

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर गळती

भाजप नेत्याकडून सासऱ्यांची चाकूने सपासप वार करून हत्या; पत्नीने माहेरी जाण्यास नकार दिल्याने उचलले भयानक पाऊल

Mumbai Pune Trains: पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! सलग ७ दिवस 'या' ३० गाड्या धावणार नाहीत; रेल्वेने सांगितलं मोठं कारण

SCROLL FOR NEXT