Santosh Deshmukh Case SaamTv
Video

Santosh deshmukh Case : ४१ इंचचा गॅसचा पाईप, ५ क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, लाकडी दांडा अन् १५६ वार; संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा खुलासा

Beed Crime Breaking News : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या विशेष पथकाने हत्येसाठी वापरलेली लोखंडी रॉड, फायटर, कत्ती सारखी हत्यारं जप्त केली आहेत.

Saam Tv

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं पोलिसांच्या विशेष पथकाने जप्त केली आहेत. संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या मारहाणीसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचा विचार केला तरी ऐकणाऱ्याच्या अंगाचा थरकाप उडेल इतक्या निर्घृण पद्धतीने देशमुख यांची हत्या केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. सध्या एसआयटी आणि सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराडच्या सरेंडरनंतर पोलिसांनी मुख्य तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. तर हत्या करण्यासाठी वापरलेले हत्यारं देखील पोलिसांनी आता जप्त केले आहेत. यात ४१ इंचचा गॅसचा पाईप, त्यावर काळया करदोऱ्याने तयार केलेली मूठ, ५ क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, एक लाकडी दांडा आणि तलवारी सारखं शस्त्र अशा हत्यारांनी त्यांची हत्या करण्यात आली आहे. इतकंच नाही तर संतोष देशमुख यांच्यावरती १५६ वार करण्यात आले होते. यात जवळपास दीड लीटर रक्त साकळलं होतं. सीआयडी तपासात काही डिजिटल पुरावे देखील हाती लागले आहेत. यासोबतच ४ लोखंडी रॉड, एक कोयता, लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT