Beed News SaamTv
Video

Beed News : धक्कादायक! जेवण मागितले म्हणून शिवभोजन केंद्राच्या मालकाने केली दिव्यांगाला मारहाण

Shivbhojan Kendra : बीडच्या परळीत शिवभोजन केंद्रावर जेवण करण्यासाठी आलेल्या एका दिव्यांग तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Saam Tv

बीडच्या परळीतून पुन्हा एकदा धक्कादायकाने संतापजनक बातमी समोर आली आहे. परळीत शिवभोजन केंद्रात जेवण करण्यासाठी आलेल्या एका दिव्यांगाला लाथाबुक्क्यानी मारहाण करण्यात आली आहे. शिवभोजन केंद्राचा मालक आचार्य आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण तयार नसल्याचं सांगत या दिव्यांगाला मारहाण करत बाहेर काढलं. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तर शिवभोजन केंद्राच्या मालकवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका शिवभोजन केंद्रावर हाताने दिव्यांग असणारा तरुण जेवण करण्यासाठी गेला होता. परंतु या शिवभोजन केंद्राचा मालक आचार्य व त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण तयार नाही, असे म्हणत या दिव्यांगाला बाहेर काढले व लाथा बुक्क्यानी मारहाण केली. हा सर्व प्रकार एका रहदारी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला असून आता तो व्हिडिओ वायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान अशा पद्धतीने जेवण मागण्यासाठी आलेल्या दिव्यांगाला मारहाणीची घटना घडल्याने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना काँग्रेसचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? राजकीय घडामोडींना वेग

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' महिन्यापासून पगारात होणार वाढ, सरकारचा मोठा निर्णय नेमका काय? वाचा...

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT