Krushna Andhale SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित | VIDEO

Accuse Krushna Andhale : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अथवा आरोपी कृष्णा आंधळे याला शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही. त्यामुळे आता पोलिसांनी त्याला फरार घोषित करून त्याची माहिती सांगणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.

Saam Tv

बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी कृष्णा आंधळे याला फरार घोषित करण्यात आलेलं आहे. कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दीड महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी म्हणून मस्साजोगच्या ग्रामस्थांसह राज्यभरातून आंदोलन करण्यात आलं. सरकारने या प्रकरणी स्पेशन एसआयटी देखील स्थापन केली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी करत आहे. हत्येनंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यावर त्यानंतर हत्या प्रकरणातील ७ आरोपींना पोलिसांनी तब्यात घेतलं आहे. मात्र आठवा आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही सापडलेला नाही. पोलिसांकडून त्याला शोधण्यासाठी पथक देखील रवाना करण्यात आलेले आहे. आता कृष्णा आंधळे याला पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. तसंच त्याच्याबद्दल माहिती सांगणाऱ्याला बक्षीस देखील देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT