Baramati News SaamTv
Video

Baramati News : बारामतीचा सस्पेन्स कायम; युगेंद्र पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

Sharad Pawar : शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे. मात्र यात बारामतीतून एकाही इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेण्यात आलेली नाही.

Saam Tv

शरद पवार यांच्याकडून बारामतीबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला आहे. बारामतीतून एकाही इच्छुक उमेदवाराची मुलाखत बघायला मिळालेली नाही. त्यामुळे विधानसभेला बारामतीतून कोण निवडणूक लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालयात होत आहेत. गेल्या 5 दिवसांपासून या मुलाखती सुरू आहेत स्वत: शरद पवार या मुलाखती घेत आहेत. मात्र यात बारामतीसाठी एकाही इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बारामतीच्या उमेदवाराबद्दल सस्पेन्स कायम आहे. तर दुसरीकडे बारामतीतून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा होत आहे. आता बारामतीतून कोणीच इच्छुक न आल्याने युगेंद्र पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. युगेंद्र पवार यांची तब्बेत खराब असल्याने ते इच्छुक म्हणून मुलाखतीसाठी येऊ शकले नाही. मात्र बारामतीचं एक शिष्ठमंडळ येऊन शरद पवार यांना आणि मुलाखत घेणाऱ्या पक्षश्रेष्ठींना भेटून गेलं असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT