Bank SAAM TV
Video

Bank Holidays : नोव्हेंबरमध्ये तब्बल ११ दिवस बँका बंद, डिजिटल सेवा मात्र २४ तास सुरू राहणार | VIDEO

RBI holiday list : नोव्हेंबर मध्ये ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआय सुट्यांच्या कॅलेंडरनुसार या महिन्यात काही राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे बॅंका बंद राहतील तर उर्वरित ठिकाणी बॅंकिग सेवा सुरु राहणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोव्हेंबर महिन्यात बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, 'नोव्हेंबर मध्ये अकरा दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये रविवार तसेच महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार या नियमित सुट्ट्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, गुरु नानक जयंतीसारख्या सणांमुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. महाराष्ट्रात गुरु नानक जयंतीनिमित्त ५ नोव्हेंबर रोजी सुट्टी असेल. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासणे महत्त्वाचे आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या सुट्ट्यांच्या काळात एटीएम, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग आणि यूपीआय (UPI) यांसारख्या डिजिटल सेवा २४ तास सुरू राहतील, ज्यामुळे तुमची अत्यावश्यक कामे खोळंबणार नाहीत.

या दिवशी बॅंका बंद राहणार : -

५ नोव्हेंबर, ७ नोव्हेंबर, ८ नोव्हेंबर, ९ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर, २२ नोव्हेंबर, २३ नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबर. नमूद केलेल्या सर्व दिवशी बॅंका बंद राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT