Balasaheb Thorat shows Sangram Bapu Bhandare’s kirtan video on stage during Sangamner rally to counter allegations Saam Tv
Video

बाळासाहेब थोरातांचा " लाव रे तो व्हिडीओ" पॅटर्न संगमनेर येथील कीर्तनाचे व्हिडिओ दाखवत आरोपांना प्रतिउत्तर|VIDEO

Balasaheb Thorat Plays Sangram Bapu Bhandare Video: संगमनेरमध्ये काढलेल्या भव्य मोर्चात बाळासाहेब थोरात यांनी कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्या आरोपांवर व्हिडिओ दाखवत जोरदार प्रतिउत्तर दिलं.

Omkar Sonawane

संगमनेर मोर्चात थोरातांनी भंडारेंचा व्हिडिओ दाखवून आरोपांना प्रतिउत्तर दिलं.

हल्ला किंवा गाडी तोडफोड झाली नसल्याचा थोरातांचा दावा.

वारकरी परंपरेच्या संदर्भात भंडारे यांना थोरातांचा थेट सवाल.

हा प्रकार सुनियोजित कट असल्याचे थोरातांचा आरोप.

कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या धमकीनंतर आज संगमनेरमध्ये थोरात यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात मंचावरील स्क्रीनवर घुलेवाडी येथील कीर्तनाचे व्हिडिओ दाखवत होणाऱ्या आरोपांवर थोरातांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर हल्ला झालेला नाही, त्यांच्या गाडीची कुणीही तोडफोड केलेली नाही तर माझ्या बदनामीसाठी सुनियोजित कट केला असल्याचा दावा थोरातांनी केलाय.

आमदार आल्यावर कीर्तनकार नारदाची गादी सोडून खुर्ची देण्यासाठी पुढे जातो आणि आमदाराच्या पाया पडतो, हे वारकरी परंपरेत बसते का? असा प्रश्न देखील व्हिडिओ दाखवत थोरातांनी उपस्थित केलाय. कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर हल्ला आणि गाडीची तोडफोडीचे आरोप झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आजच्या मोर्चादरम्यान " लाव रे तो व्हिडीओ " पॅटर्न राबवत प्रतिउत्तर दिलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Bharat Train: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, मुंबई ते सूरत प्रवास होणार सुसाट, नमो भारत अन् वंदे मेट्रो लोकल धावणार

Nagpur : कोर्टाच्या पायऱ्या चढताना खाली कोसळले, ६४ वर्षीय वकिलाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात उन्हाचा कडाका वाढला

Dark Circle Remedy: महागड्या क्रीम वापरूनही डार्क सर्कल्स जात नाहीत? मग हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा

Petrol Diesel Rate: राज्यात पेट्रोल डिझेलचे दर बदलले, परभणी-जळगावमध्ये सर्वात महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT