Tejaswi Ghosalkar leads BJP rally with chants of Balasaheb Thackeray, stirring political reactions. Saam Tv
Video

Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या रॅलीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा|VIDEO

Balasaheb Thackeray Name Chanted At BJP Rally: तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांच्या रॅलीत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Omkar Sonawane

तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या रॅलीत चक्क बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. 'बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, हर हर महादेव' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तेजस्वी घोसाळकर या दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असून त्यांनी नुकताच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या रॅलीत शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा जयघोष झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या प्रचार फलकामध्ये त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांचे फोटो वापरल्याने खासदार संजय राऊत यांनी टीका देखील केली होती. तेजस्वी यांनी आपल्या रॅलीमध्ये अमित शाह आणि मोदी यांचे फोटो वापरावे असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांनी हल्लाबोल केला होता. अशातच आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्याने ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महापालिकेसाठी भाजपचा नवा प्लॅन, ठाकरेंच्या रणनीतीला भाजपचा शह?

Maharashtra Corporation Election: मोठी बातमी! आमदार, खासदारांच्या पोरांना तिकीट नकोच; ऐननिवडणुकीत भाजपचा निर्णय

राज ठाकरेंच्या मनसेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर, कोणाला कुठून संधी?

Kala Vatana Rassa Recipe: काळा वटाणा रस्सा भाजी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीच्या चर्चेत ट्विस्ट

SCROLL FOR NEXT