Bajrang Sonwane SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : खासदार सोनवणे आणि नवनीत कॉवत यांच्यात काय झाली चर्चा? पाहा Video

MP Bajrang Sonwane News : माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बजरंग सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. अर्धातास चाललेल्या या चर्चेचा सोनवणे यांनी पत्रकारांना तपशील दिला आहे.

Saam Tv

खासदार बजरंग सोनवणे हे आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. गेल्या 20 मिनिटांपासून त्यांच्यात पोलीस अधीक्षक कार्यालयात चर्चा सुरू आहे. केजच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बजरंग सोनवणे आणि नवनीत कॉवत यांच्यात ही बैठक सुरू आहे. लोकसभेत देखील सोनवणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. तसंच कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांनी बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर बजरंग सोनवणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नवीन पोलीस अधीक्षक यांना बीड जिल्ह्याविषयी माहिती सांगितली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुन्ह्या संदर्भात आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी काय करता येईल त्याबाबतीत प्रयत्न करा, अशा सूचना या भेटीतून कॉवत यांना केल्या आहेत. तसंच जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना केल्या असल्याचं सोनवणे यांनी सांगितलं. तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाची गती समाधानकारक नसल्याचं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT