Bombay High Court’s Kolhapur Bench grants bail to Dr. Virendra Tawde, Amol Kale, and Sharad Kalskar in the Govind Pansare murder case — all 12 accused now out on bail. Saam Tv
Video

Govind Pansare Case: मोठी बातमी! गोविंद पानसरे हत्या प्रकरणी तावडेंसह 3 आरोपींना जामीन मंजूर|VIDEO

Bombay High Court Kolhapur Bench Grants Bail: गोविंद पानसरे हत्या प्रकरणात संशयित डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाला आहे.

Omkar Sonawane

कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कडून जामीन मंजूर झालाय.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आज पर्यंत एकूण 12 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 9 जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता. मात्र डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना जामीन मंजूर झाला नव्हता. जामीन न मिळाल्यामुळे तिघेही कळंबा कारागृहात होते. आज तिघांच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरातील सर्किट बेंच इथं सुनावणी झाली. यामध्ये तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आजपर्यंतचे एकूण सर्वच 12 संशयीतांना आता जामीन मंजूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT